Pune Drug : पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाधड कारवाई; 37 लाखांचे कोकेन, एमडी, गांजा जप्त

Pune Drug : पुण्यात ड्रग्स तस्करी सुरुच आहे. त्यातच आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तब्बल 37 रुपये किंमतीचं ड्रग्स जप्त केलं आहे. पुण्यातील कोंढवा, विश्रांतवाडी आणि वानवडी या परिसरात कारवाई करुन कोकेन, मेफेड्रॉन आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. 

उंड्री मिरॅकल लाईफ स्पेस सोसायटी समोरील सार्वजनिक रोडवर एक परदेशी नागरिक कोकेन विक्री करण्यासाठी आला आहे अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मिळाली पथकाने सापळा रचून हसेनी मुवीनी मीचाँग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 152 ग्रॅम कोकेन जप्त केले. त्याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Pune News : पुणे विद्यापीठ परिसरात आजपासून वाहतुकीत बदल, शिवजंयतीनिमित्तही अनेक मार्ग बंद; काय असतील पर्यायी मार्ग

 

दुसऱ्या कारवाईत किसन किसन नंदकिशोर लधार (वय 34, रा. न्यु दर्शन कॉलनी, कलवड वस्ती, लोहगांव,  मूळ रा. बिकानेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 4 लाख 50 हजारांचे 22  ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. यासोबतच त्याच दिवशी आरोपी लधार हा धानोरीमधील माधवनगर रोड येथील अगत्य हॉटेलसमोर आला असून तो एमडीची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. यावरुन पोलिसांनी कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply