Pune Cyber Fraud : पुण्यातील ऑनलाइन पेमेंट कंपनीला घातला ३.५ कोटींचा गंडा; २ सायबर चोरट्यांना पश्चिम बंगालमधून अटक

Pune Cyber Fraud : ऑनलाइन पेमेंट कंपनीची तब्बल ३.५ कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. या प्रकरणी दोघा सायबर चोरट्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. उबेद ऊर्फ उब्बेदुल्ला अन्सारी आणि आयुब बशिर आलम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागरिकांना ऑनलाइन पेमेंटची सुविधा देणाऱ्या येरवडा येथील इझी-पे प्रा.लि. कंपनीची ३.५ कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता. इझी-पे चे नोंदणीकृत एजंटांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज चालते. या कंपनीतील नोंदणीकृत एजंटांपैकी ६५ जणांनी संगनमत करून कंपनीच्या वेबपोर्टल अॅपव्दारे फसवणूक केल्याचे समोर आले होते.

Manoj Jarange : शिकला होता तर तुरुगांत कशाला गेला, माझं शिक्षण नाही तरी मी आरक्षण निर्णयावर आणलं, जरांगे पाटलांची भुजबळांवर जहरी टीका

आरोपींनी अनधिकृत मोबाईल संचांद्वारे कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला. तसेच कंपनीच्या खात्यामधून एजंटच्या कमिशनव्यतिरिक्त तीन कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांची रक्कम इतर ४४ बँक खात्यांत जमा करून फसवणूक केली. याबाबत पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी सायबर पोलिसांनी २ आरोपींना आधीच अटक केली होती. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून पुणे सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. परंतु आरोपी दिल्ली, बिहार येथून पश्चिम बंगाल येथे गेल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा माग काढत अन्सारी आणि आलम या दोघांना कोलकतामधून ताब्यात घेतले. न्यायालयाने या दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply