Cyber Crime : इंस्टाग्रामवरील जाहिरातीवर क्लिक करणं पडलं महागात, ७१ लाखांची फसवणूक… रशियन आरोपीला अटक

Pimpri-Chinchwad : सोशल मीडिया हे जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, एक्स या ऍपवर आपण दिवसभर ऍक्टिव्ह असतो. पण हेच सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आपल्याला महागात ही पडू शकतात. पिंपरी- चिंचवडमधील संगणक अभियंत्याची ७१ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

इन्स्टाग्रामवर आलेल्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना शेअर मार्केटच्या ग्रुपमध्ये ऍड करून चांगले रिटर्न देण्याचं आमिष दाखवून तब्बल ७१ लाखांची फसवणूक केली. घटनेप्रकरणी सायबर पोलिसांनी गोवा राज्यातून रशियन आरोपीला अटक केली आहे. आरोपी टोनीच्या माध्यमातून सर्व सूत्र पुण्यात राहणारा आरोपी श्रेयस संजय माने बघायचा त्याला देखील पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत.

Mahayuti Cabinet Expansion : शिंदेंनी मंत्रिपदाचं प्रॉमिस तोडलं; मोठा निर्णय घेत आमदारानं दिला राजीनामा



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply