Pune Crime News : कोयता गँगच्या म्होरक्याचा कोयत्यानेच खात्मा; 10 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News : पुण्यात कोयता गँगची मोठी दहशत पसरली आहे. अशात शनिवारी खळबळजनक घटना घडली. पुण्यातील इंदापूरमध्ये कोयता गँगचा म्होरक्या असलेला अविनाश धनवेची कोयत्यानेच हत्या करण्यात आली. अविनाश आळंदीमध्ये कोयता गँगचा म्होरक्या होता. सदर घटनेनंतर अविनाशच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

आधी गोळ्या झाडल्या मग कोयत्याने वार

पुणे-सोलापूर रष्ट्रीय महामार्गावर इंदापूर बाह्यवळण येथे जगदंब नावाचे हॉटेल आहे. शनिवारी रात्री ८ वाजता अविनाश आणि त्याच्यासह अन्य काहीजण जेवणासाठी आले होते. यावेळी जेवत असताना दोन तरुण हॉटेलमध्ये शिरले. कुणाला काही कळण्याआधीच त्यांनी अविनाशवर गोळ्या झाडल्या. अविनाश खाली पडल्यानंतर त्यांनी कोयत्याने त्याच्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या केली. सदर घटनेचा थरार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकीय नेत्यांना बंदी; बंदीचे बॅनर लावून एकत्र येत घेतली शपथ

अविनाशच्या पत्नीने या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली. दोन जण अविनाशला घरी बोलवालया आले होते. तो त्यांच्यासोबत बाहेर गेल्यावर कट रचून त्याची हत्या करण्यात आली आहे. असं पत्नीने म्हटलं. तसेच तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांना खुशाल तापकिर, विशाल तापकिर, मयुर पाटोळे, राहुल चव्हाण, देवा सुतार, मयुर मानकर, शिवा बेडेकर, प्रकाश उर्फ पप्पु बनकर, सतिष पांडे, प्रणिल उर्फ बंटी मोहन काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अविनाशने स्वत:ची वेगळी टोळी निर्माण करतकोयचा गँग बनवली. यामधून तो नगरिकांमध्ये दहशत पसरवत होता, तसेच परिसरात स्वत:चे वर्चस्व निर्माण करू पाहत होता. त्याच्यासह पुण्यात अन्य काही टोळ्यांचा देखील सुळसुळाट आहे. श्रेयवादाच्या या लढाईतूनच अविनाशची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply