Pune Crime News : पुण्यातील ड्रग्ज विक्रीचे 'दिल्ली' कनेक्शन; पोलिसांच्या छापेमारीत ४००० कोटींचे अमली पदार्थ जप्त

Pune Crime News : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्ली कनेक्शन समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई करत मंगळवारी (२० फेब्रुवारी) दिल्लीतून तब्बल १८०० कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने काही तस्करांना अटक देखील केली आहे. पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  

HSC Board Exam : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; कॉपी बहाद्दरांना पकडण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथके

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सॅम आणि ब्राऊ नावाच्या तस्करांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरू असताना पुणे पोलिसांनी  शहरातील ड्रग्ज रॅकेटचा पदार्फाश करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे, कुरकुंभसह दिल्लीत देखील छापेमारी केली आहे.

या छापेमारीत पोलिसांनी अवघ्या ३ दिवसात ४००० कोटी रुपयांचे २००० किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहे. दिल्लीत गुन्हे शाखेने टाकलेल्या पहिल्या छाप्यात ६०० किलो, तर दुसऱ्या छाप्यात तब्बल १२०० कोटी रुपयांचे ड्रग्स सापडलं आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणादणे आहे. 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेली कारवाई

  • फेब्रुवारी १८: सोमवार पेठेतील छापेमारी मध्ये २ किलो एमडी जप्त.

  • फेब्रुवारी १९: विश्रांतवाडी येथील गोदामातून १०० कोटीपेक्षा अधिक किंमतीचे ५५ किलो एमडी जप्त.

  • फेब्रुवारी २०: कुरकुंभ एमआयडीसी मधील एका कारखान्यात ११०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त.

  • फेब्रुवारी २०: पुणे पोलिसांची थेट दिल्लीत कारवाई. ८०० कोटी रुपयांचे ४०० किलो एमडी केले हस्तगत.

  • फेब्रुवारी २१: पुणे पोलिसांच्या आणखी एका कारवाई मध्ये दिल्लीत मिळून आले १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ६०० किलो एमडी जप्त केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply