Pune Crime News : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, दहा जणांवर गुन्हा दाखल; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime News : मावळच्या कामशेत येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये रोख रकमेसह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सुमारे दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील खडकाळे येथे नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदीस्त खोलीमध्ये काही जण जुगार अड्डा चालवत आहेत. हे बेकायदेशिररित्या सुरु आहे. त्यामुळे परिसरातील युवकांवर  व नागरिकांवर वाईट परिणाम होत आहे अशी तक्रार पाेलिसांना प्राप्त झाली.

 

त्यावरून सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांच्या पथकाने खडकाळे मधील नाणे रेल्वे गेट जवळील खाजगी जागेवरील बंदीस्त खोलीमध्ये छापा टाकला. यावेळी जुगार अड्डा चालविणारा एजंट व जुगार खेळणारे असे एकूण दहा ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडून रोख रक्कम, गाड्या व मोबाईल फोन असा अकरा लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *