Pune Crime : पुण्यात १७ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; देहविक्री करण्यास भाग पाडलं; पती-पत्नीविरोधात गुन्हा

Pune Crime : वडिलांच्या उपचारासाठी उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने एका तरुणीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी-पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल केलाय. 

आकाश सुरेश माने आणि पूनम आकाश माने, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित तरुणी पुण्यातील कात्रज परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीचे वयोवृद्ध वडील आजारी पडले होते. 

NCP MLA Disqualification Verdict : अजित पवार यांचे सर्व आमदार पात्र; शरद पवार गटालाही दिलासा,निकाल नेमका कोणाच्या बाजुने लागला?

त्यांच्या उपचारासाठी तिने आरोपी पूनम आणि आकाश यांच्याकडून ३० हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला वेळेवर पैसे परत करता आले नाही. त्यामुळे आरोपी आकाशने तरुणीला धमकावणे सुरू केले. 

इतकंच नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केला. आरोपी आणि त्याची पत्नी इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी तरुणीवर दबाव आणून तिला देहविक्री करण्यास भाग पाडले. तसेच तिच्याकडून पैसे देखील वसूल केले.

धक्क्दायक बाब म्हणजे, आरोपी हे स्वत: ग्राहकांचा शोध घेऊन तरुणीची देहविक्री करीत होते. ग्राहकांकडून येणारे पैसे ते जमा करीत होते. आरोपींचे कृत्य दिवसेंदिवस वाढ असल्याने पीडित तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply