Pune Crime News : 'पोलिसांची काम करण्याची पद्धत माहितीये ना कशीये?', ACP सुनील तांबेंचा गुन्हेगारांना सज्जड दम

Pune Crime News : अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहे. अमितेश कुमार कडक शिस्तीचे अधिकारी मानले जातात. पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथम त्यांनी पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यानुसार काल पुण्यातील २६७ कुख्यांत गुंडांची परेड घेण्यात आली.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुन्हेगारांना सज्जड दम भरलाय. सहाय्यक पोलीस आयुक्ताचं हे भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. क्राईम ब्रान्चची काम करण्याची पद्धत माहितीये ना कशी आहे? असं सुनील तांबे गुन्हेगारांना बोलताना दिसत आहेत. 

Sambhajinagar News : गोव्याची दारू विकणारा अखेर ताब्यात; दीड लाखांची दारू जप्त

काल पुण्यात तब्बल २६७ गुंडांची परेड आणि झडती घेण्यात आली. यासाठी पुणे पोलीस आयु्क्तालयातील मोकळ्या जागेवर या सगळ्यांना एका रांगेत उभे करण्यात आले होते. यावेळी तुम्ही तुमचे राहण्याचे पत्ते बदलता, भाई असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकता. मात्र यापुढे असं दिसलं तर तुम्हाला पण त्यात आरोपी केले जाईल, असा इशारा तांबे यांनी दिला.

कुख्यात गुंड गजानन मारणे, निलेश घायवळ यांचे नाव घेऊन, 'क्राईम ब्रान्च काम कसं करतं माहिती ना' असा दम सुद्धा तांबे यांनी उपस्थित गुन्हेगारांना भरला. या भाषणाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

पोलिसांचा गुन्हेगारांना इशारा

गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचे नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रील्स टाकायच्या नाहीत. राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास तो क्रमांक बदलल्याची माहिती पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply