Pune Crime News : पुणे हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा एक फोन; रुग्ण रस्त्यावर, पुण्यात एकच गोंंधळ

Pune Crime News : पुण्यातील पुणे हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याने चांगलीच खळबळ उडाली. पोलीस आणि बॉम्बशोधक पथक लगेच दाखल झालं. परिसरात शोधाशोध सुरु असताना बॉम्ब सापडला नसल्याने हा फोन फेक असल्याचं समोर आलं.  गुरुवारी रात्री हा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. मात्र या एका फोनमुळे पुण्यातील सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागल्याचं पाहायला मिळालं.

गुरुवारी रात्री पुण्यातील पुणे हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गेला आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला. या फोन कॉलची गंभीर दखल घेत पोलीस आणि बॉम्बशोधक पथक पुणे हॉस्पिटलमध्ये दाखल झालं. हॉस्पिटलमधील रुग्ण आणि डॉक्टरांना तातडीने बाहेर काढण्यात आलं आणि बॉम्ब कुठे आहे याचा शोध सुरू झाला. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने संपूर्ण हॉस्पिटल पिंजून काढलं मात्र त्यांना कुठेही बॉम्ब अथवा संशयस्पद वस्तू आढळली नाही आणि त्यानंतर हा कॉल फेक असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Maratha Reservation : ओबीसी आरक्षणास किंचितही धक्का लागणार नाही, सरकारची भूमिका स्पष्ट : उदय सामंत

आज (2 फेब्रुवारी) पुन्हा एकदा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे कॉल आले. त्यावर पोलिसांनी त्या त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला मात्र या अफवा असल्याचे निष्पन्न झालं. परंतु पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या या फोन कॉल नंतर पोलीस सतर्क झाले आहे. आजही ज्या ठिकाणी बॉम्ब आहेत, असे फोन आले होते त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र अशा प्रकारे फोन कॉल्स करून अफवा पसरवणाऱ्यांवर इथून पुढे कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. 

पुण्यात यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यात पुणे स्टेशन, विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे कॉल्स नियंत्रण कक्षाला आले आहेत. त्यासोबतच बॉम्बने पुणे स्टेशन उडवून देण्याच्या धमक्यादेखील आल्या आहेत. या अशा धमक्यांमुळे संपूर्ण पोलीस पथक कामाल लागतं त्यासोबत  बॉम्बशोधक आणि नाशक पथकदेखील कामाला लागतं. मात्र अनेकदा हे फोन आणि धमक्या फेक असल्याचं समोर येतं. त्यामुळे आता या सगळ्या फोन करणाऱ्यांचा तपास करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply