Pune Crime News : पुण्यात कॉलेज तरुणीवर सामूहिक अत्याचार; हडपसर परिसरातील संतापजनक घटना, पोलिसांत गुन्हा

Pune Crime News : पुण्यातील हडपसर परिसरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली. एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. मांजरी परिसरातील नदीपात्रात हा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अनुराग आणि गणेश अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हे पीडित तरुणीचे मित्र होते.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून आरोपींनी दुचाकीवरून तरुणीला मांजरी येथील निर्जनस्थळी नेलं. 

Sambhaji Nagar : बँका बुडाल्या, ठेवीदार महिला भडकल्या; पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या

रात्री परिसरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपींनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेला नदीपात्रातच सोडून दिलं. याबाबत कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देखील पीडितेला दिली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply