Pune Crime News: पुण्यातील बुधवारपेठेत अचानक पोलीस धडकले; ७ बांगलादेशी महिलांना अटक

Pune Crime News : मागील काही दिवसांपासून पुण्यात बांगलादेशी नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बुधवारपेठ परिसरात अनेक बांगलादेशी नागरिक तसेच महिला अवैध पद्धतीने वास्तव्य करत असल्याचं समोर आलं आहे. हीच बाब लक्षात घेता पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी सकाळच्या सुमारास बुधवारपेठेत धडक मारली. 

अचानक पोलीस धडकताच बुधवार पेठेत अवैधरित्या वास्तव करणाऱ्यांमध्ये चांगलीच धांदल उडाली. यावेळी पोलिसांनी छापेमारी करत सात बांगलादेशी महिलांना अटक केली. या महिलांकडे भारतात येण्याचा पुरावा नसल्याचं तपासात उघड झालं आहे.

 

याप्रकरणी बुधवार पेठेतील कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेलाही सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बुधवारपेठ परिसरात या बांगलादेशी महिला राहत होत्या. यातील बहुतांश महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होते.

ही बाब सामाजिक सुरक्षा दलाच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने बुधवारपेठेत धडक मारली. बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्याची सामाजिक सुरक्षा दलाची ही महिनाभरातील तिसरी कारवाई आहे. यापूर्वी देखील पथकाने बुधवारपेठेत धडक मारत काही बांग्लादेशी महिलांना अटक केली होती.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या महिलांनी वेगवेगळ्या अमिषाने पुण्यात बोलावल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी फेसबुकवर ओळख करून तुझी भारतात त्वचारोगाची ट्रीटमेंट करून असं सांगून बांगलादेशी महिलेला विमानाने पुण्यात बोलून फसवणूक केल्याचा उघड झालं आहे. याप्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर पीटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply