Pune Crime News : ससून रुग्णालयाबाहेर २ कोटींचे अमली पदार्थ जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

Pune Crime News : पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करत असताना दुसरं संकट पोलिसांसमोर उभं राहिलं आहेत. पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकू लागलंय की असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील काही दिवसात पुणे पोलिसांना अनेक कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे.

आता पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहे. 

Rs.2000 Note : दोन हजारांच्या नोटांबाबत मोठी अपडेट; RBI कडून नोटा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

या ड्रग्स MD म्हणजेच मेफिड्रोनची किंमत तब्बल २ कोटी रुपये आहे. यामागे हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी २ तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. वैद्यकीय उपचारासाठी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. ससून रुग्णालयातील कुणी कर्मचारी या प्रकरणात आहेत का? या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply