Pune Crime News: नोकरीच्या बहाण्याने सौदी अरेबियात नेलं अन्... पुण्यातील महिलांसोबत घडलं भयंकर

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नोकरी तसेच पैसे कमावण्याचं अमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील तीन महिलांना नोकरीचं अमिष दाखवून सौदी अरेबियात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकूण अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

अरेबियात सफाई कामगार म्हणून तुम्हाला नोकरी मिळेल, दरमहा ४० हजार रुपयांचे वेतन देखील मिळेल, असं अमिष दाखवलं. आर्थिक परिस्थितीमुळे खचलेल्या महिलांनी लगेच यासाठी होकार दिला.

आमिषाला बळी पडून महिलांनी मुंबईतील दलाल महिलांशी संपर्क साधला. या दलाल महिलांनी पुण्यातील तीन महिलांना सौदी अरेबियातील रियाध शहरात साफसफाईचे काम मिळवून दिले. इतकंच नाही, तर दलालांनी या गरीब महिलांची प्रत्येकी ४ लाख रुपयांत विक्री केली.

OBC Morcha : ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका; बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

सौदी अरेबियात व्यक्तींनी या तीनही गरीब महिलांचा छळ सुरू केला. या महिलांकडून दिवसभर काम करून घेतले जात होते. तसेच त्यांना वेळवर जेवण सुद्धा देत नव्हते. दरम्यान, एका सामजिक कार्यकर्त्याने ही बाब राज्य महिला आयोगाच्या निर्दशनात आणून दिली.

महिला आयोगाच्या पाठपुराव्यामुळे या महिलांना भारतात परत आणण्यात यश आले. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी मुंबईतील दलालांवर गुन्हा दाखल केला आहे. नसरीन भाभी, अब्दुल हमीद शेख, शमिमा खान आणि हकीम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply