Pune : संतापजनक प्रकार! कचऱ्यात आढळले स्त्री जातीचे अर्भक; पोलिसांकडून तपास सुरू, पुण्यात खळबळ

Pimpri-Chinchwad : पिंपळे निलख परिसरात एका दिवसाचं मृत स्त्री अर्भक आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे स्त्री अर्भक कुणी आणि का कचऱ्यात फेकून दिले? याचा तपास पोलीस करत आहेत. आजही तथाकथित पुढारलेल्या समाजात मुलगी नकोशीच असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे. वंशाचा दिवा म्हणून केवळ मुलांनाच महत्त्व दिलं जातं, ही मानसिकता अजूनही कायम असल्याचं या प्रकारावरून अधोरेखित होत आहे.

Pune : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाने सर्व नऊ आरोपींबाबत महत्त्वाचा निर्णय दिला, नेमकं काय घडलं?



पिंपळे निलख येथील कचऱ्यात एका अज्ञात महिलेनं एका दिवसाचं मृत स्त्री अर्भक फेकून दिल्याची माहिती नागरिकांनी सांगवी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृत अर्भक ताब्यात घेतलं असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. हे मृत स्त्री अर्भक कुणी आणि कोणत्या कारणातून फेकून दिले? याचा सखोल तपास सांगवी पोलीस करत असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण पसरलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *