Pune Crime : पुणे शहरात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच; नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण

Pune : पुणे शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील सहकारनगर पाठोपाठ भारती विद्यापीठ हद्दीतही टोळक्याकडून वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं आहे. 

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनांची तोडफोड

पुणे शहरात सुरू असलेले वाहन तोडफोडीची मालिका सुरूच आहे. पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याने वाहनांची तोडफोड केली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिलारेवाडीतील ओम साई निवास येथील वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये दोन चार चाकी, एक रिक्षा, दोन दुचाकी आणि एक टँकर अशा वाहनांचे नुकसान झाले आहे.

वाहनाच्या तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं आहे. वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं काम देखील पोलिसांनी सुरू केलं आहे. या प्रकरणी पाच ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.

Pimpri Chinchwad Crime : सुरक्षा रक्षक म्हणावं की गुंड, लोखंडी रॉडने केली सोसायटीतील रहिवाशांना मारहाण

अल्पवयीन टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड

सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही रविवारी सायंकाळी अल्पवयीन टोळक्यानी वाहनांची तोडफोड केली. धनकवडी येथील चव्हाण नगर परिसरातील शांतीनगर वसाहतीत दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांनी लाकडी दांडक्याने आणि दगडाने पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई

काही दिवसांपूर्वी सहकार नगर परिसरात तब्बल 26 गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. याच सहकार नगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply