
Pune : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत घातक गुंगीकारक औषधी गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी ताब्यात घेत सुमारे सात हजार गोळ्यांचा साठा जप्त केला. शहरातील कोंढवा, हडपसर, कासेवाडी, कॅम्प आणि येरवडा परिसरात गुंगीकारक गोळ्यांची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर हमीद शेख (वय ४०, रा. बुर्ज अल मर्जान, कोंढवा) आणि सुनील गजानन शर्मा (वय ३४, रा. सुखसागरनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहरातील शाळा- महाविद्यालय आणि झोपडपट्टी परिसरात नशेच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात
|
|
आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले नशेच्या आहारी जात आहेत. या नशेखोरीला आळा घालण्यासाठी खडक पोलिसांनी मोहीम राबवली. नशेच्या गोळ्या विक्रीसाठी दोघेजण दुचाकीवरून येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार आशिष चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या पथकाने बुधवारी पहाटे जेधे चौकात सापळा रचला. दोघांची तपासणी केली असता, दुचाकीच्या डिक्कीत आणि कोंढव्यातील घरात नशेच्या गोळ्यांचा साठा आढळला.
नशेच्या गोळ्यांचे रॅकेट उघडकीस
दोघेही विनापरवाना आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय या गोळ्यांचा नशेसाठी अवैध व्यापार करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. आरोपी विविध ठिकाणांहून गोळ्यांचा साठा मागवत असत. कोंढवा, कासेवाडी, हडपसर, कॅम्प, येरवडा या भागात नशेच्या गोळ्या विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यायालयाने आरोपींना दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे करीत आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी मनोजकुमार लोंढे, कुलदीप व्हटकर, महेंद्र कांबळे, पोलिस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, इरफान नदाफ, विकास पांडोळे, विश्वनाथ गोरे, शुभम केदारी, शोएब शेख, निलेश दिवटे आणि मयूर काळे यांचा पथकात समावेश होता.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

