पुणे: शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; वकिलासह व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

पुणे: शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एका वकिलासह व्यावसायिकाच्या विरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ॲड. विक्रम भाटे (वय ३४) आणि वैभव शिंदे (वय ३४) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडीत तरुणी आणि ॲड. भाटे, शिंदे यांची ओळख होती. ॲड. भाटे आणि शिंदे तरुणीच्या घरी गेले होते. त्या वेळी त्याने तिला शीतपेयात मिसळून गुंगीचे औषध दिले. तरुणीला शीतपेय पिण्यासाठी आग्रह केला. तरुणी बेशुद्ध पडल्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी अनैसर्गिक कृत्य केल्याचे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपीने मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. त्यानंतर त्यांनी तिला धमकावण्यास सुरुवात केली. धमकावून त्यांनी दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असे तिने फिर्यादीत नमूद केले. आरोपींनी मारहाण करुन धमकावले. त्यांच्या धमक्यांमुळे तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. बलात्कार, धमकावणे तसेच अनैसर्गिक कृत्य केल्या प्रकरणी ॲड. भाटेसह शिंदेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply