Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड

Pune : शहरात किरकोळ वादातून हाणामारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. लोहगाव भागातील फाॅरेस्ट पार्क सोसायटीत टोळक्याने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. तलवारी उगारुन टोळक्याने घरातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला.

याबाबत निवृत्त पोलीस अधिकारी गोरखनाथ एकनाथ शिर्के (वय ६५, रा. फाॅरेस्ट पार्क, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोविंद हनुमंत कॅनल, त्याची पत्नी, मयूर सकट (तिघे रा. येरवडा), राजू देवकर, कार्तिक राजू देवकर यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिासांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखनाथ शिर्के निवृत्त पोलीस अधिकारी आहे. पुणे शहर पोलीस दलातील बंडगार्डन, चतु:शृंगी पोलीस ठाण्यासह ते विविध पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. निवृत्तीनंतर त्यांनी लोहगावमधील फाॅरेस्ट पार्क सोसायटीत बंगला बांधला. आरोपी गोविंद कॅनल याच्याकडे सोसायटीतील स्वच्छतेचे कंत्राट आहे. सोसायटीतील रस्त्यावर असलेले गटारचे झाकण तुटले होते. शिर्के यांच्याकडे एक जण मोटारीतून आला. मोटारीचे चाक झाकणावरुन गेल्याने झाकण तुटल्याच आरोप कॅनल याने केला होता.

Maharashtra Budget 2025 : मुंबईत तिसरं विमानतळ, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनला जोडणार; अजित पवारांची मोठी घोषणा

या कारणावरुन शिर्के आणि कॅनल यांच्यात वाद झाला. त्यानंतर कॅनल आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार शिर्के यांच्या घरात शिरले. त्यांनी शिर्के यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. आरोपींनी तलवार उगारुन दहशत माजविली. शिर्के यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply