Pune Crime : पुण्यात मध्यरात्रीचा थरार! सिमेंट ब्लॉक डोक्यात घातला, सराईत गुन्हेगारांनी केला तरुणाचा खून

Pune : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात मध्यरात्री साडेतीन वाजता एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. मारहाण करुन मग तरुणाची हत्या केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशक्रिया विधी भैरवनाथ मंदिरासमोर तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी प्रथम तरुणाला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात काठी आणि सिमेंट ब्लॉक मारला. यात डोक्याला जबर मार लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री साडेतीन वाजता घडली.

Pune : सिंहगड रस्ता परिसरातील विहिरीतील दूषित पाण्यामुळेच पुण्यात जीबीएस; आरोग्यमंत्री आबिटकर यांची कबुली

मृत तरुणाचे नाव मल्लेश कोळी असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो आर. के. कॉलनी, गोकुळनगर, कोंढवा येथे राहत होता. या तरुणाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी हल्लेखोरांना शोधायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाणात वाढ होत आहे. त्यातही तरुणांकडून होणाऱ्या हिंसेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री-अपरात्री कोयता घेऊन फिरणाऱ्या कोयता गँगमुळेही पुणेकर त्रस्त झाले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्रीय झाली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *