Pune Crime : पुण्यात रक्तरंजित थरार, भररस्त्यात सराईत गुन्हेगाराची हत्या; तिघांना अटक

Pune Crime : मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरात भरदिवसा गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहीला की नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यातच गुरुवारी २२ ऑगस्टच्या मध्यरात्री पुण्यात एका सराईत गुन्हेगारीची हातोडीने ठेचून हत्या करण्यात आली. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव पुलाजवळील क्लासिक बारसमोर मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गोट्या उर्फ अमोल शेजवाळ (वय:३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता, पुणे) असे खून झालेल्या  व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून गुन्हा त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील एका बारमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार गोट्या शेजवाळ व त्याचे मित्र दारू पिण्याकरिता बसले होते. गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिलावरून बारचालक आणि गोट्या शेजवाळ यांच्यात वाद सुरू झाला.

Mumbai : "कोणीतरी हे रचलेले! मुलींना स्वच्छतागृहात नेण्यासाठी तीन बाई होत्या...; बदलापूर प्रकरणाला वेगळं वळण, सनसनाटी दावा!

दारूचे बील न देताच गोट्या बार बाहेर जाऊ लागल्याने तेथील बाऊन्सरने त्याला हॉटेलबाहेर अडविले. त्यातून त्याचे बाऊन्सरबरोबर वाद सुरू झाले. यात वाद इतका टोकाला गेला की, त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी बारलगत असलेल्या टायर पंक्चर दुकानातील हातोडी आणून बाऊन्सरने गोट्याच्या डोक्यात वार केला.

हातोडीचा घाव बसताच गोट्या जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करीत गोट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply