Pune Crime News : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; लोहगाव परिसरात दुकानासह वाहनांची तोडफोड

Pune Crime : पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने दहशत घालण्यात सुरुवात केली आहे. लोहगाव परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास कोयता गँगच्या गुंडांनी दुकानाची तसेच वाहनांची तोडफोड केली. इतकंच नाही, तर हातात कोयते नाचवत या गुंडांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना देखील धमकावलं. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दहशत माजविणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या गुंडांना पकडून त्यांची भररस्त्यात धिंड काढली होती. अनेकांना तडीपाराच्या नोटीसाही धाडल्या होत्या.

Navapur Nagan Project : अतिवृष्टीमुळे भरडूच्या नागण मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा

मात्र, पुन्हा हळुहळू कोयता गँगचे  गुंड सक्रिय होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लोहगाव परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक कोयता गँगचे गुंड आले. त्यांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली. आम्ही इथले भाई, आमच्या नादाला लागू नका, असं म्हणत परिसरातील नागरिकांना धमकावले.

इतक्यावरच न थांबता या गुंडांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. चेनाराम चौधरी यांच्या दुकानातही कोयता गँगचे गुंड शिरले. त्यांनी दुकानात तोडफोड करत धुडगूस घातला. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केलाय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply