Pune Crime : तुरुंगातून सुटून आला, अन् तिघांनी गाठून काटा काढला; पुण्यातल्या येरवड्यामध्ये तरुणाची निर्घृण हत्या

 

Pune Crime : पुण्यामध्ये गन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशामध्ये पुण्याच्या येरवड्यामध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिघांनी तीक्ष्ण हत्याराने या तरुणाची हत्या केली. बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर चंद्रकांत उर्फ बाळू गवस (वय २५ वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुधीर सराईत गुन्हेगार होता. तो येरवडाच्या जयप्रकाश नगरमध्ये राहत होता. पूर्ववैमनस्यातून पुण्यात सुधीरची हत्या करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री जुन्या वादातून आचार्य कुटुंबीयांनी धारधार हत्यारांसह सुधीरचा पाठलाग केला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुधीर आकाश मिनी मार्केटमधील एका दुकानाच्या समोर पत्र्याच्या मागे लपून बसला होता. त्याचवेळी त्याला गाठून तिघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

Satara : सातारा-महाबळेश्वर रोडवर भीषण अपघात; भरधाव कार वेण्णा नदीत कोसळली, एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी

सुधीरच्या डोक्यावर आणि अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुधीरचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रवीण रामचंद्र आचार्य (४४ वर्षे), स्वप्निल प्रवीण आचार्य (२८ वर्षे) आणि रवीकिरण रामचंद्र आचार्य (३५ वर्षे) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. हे तिघे आरोपी सुधीर राहत होता त्याच परिसरात राहत होते.

सुधीर गवस याचे आचार्य कुटुंबासोबत पूर्वीचे वाद होते. तसेच त्याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. काही दिवसापूर्वी सुधीर जेलमधून सुटून बाहेर आला होता. सुधीर जेलमधून बाहेर आल्याचे कळताच तिन्ही आरोपींनी त्याचा काटा काढण्याचा कट रचला आणि त्याची हत्या केली. सुधीरच्या हत्येची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. येरवडा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply