Pune Crime News : पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेनं खळबळ

Pune Crime News : वाहन अडवल्याच्या कारणावरून पुण्यात एका महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना शहरातील बुधवार चौकात शुक्रवारी (ता. ५ जुलै) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास शहरातील बुधवार चौकात पोलीस  वाहतुकीचे नियमन करीत होते. यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्याने संशयावरून एका वाहनाला अडवले.

Dharashiv Bribe Case : जिओ टॅगिंग करण्यासाठी घेतले १० हजार; कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या ताब्यात

या वाहनचालकाने त्यांच्यासोबत बाचाबाची केली. इतकंच नाही, तर त्याने एकाने बाटलीतील पेट्रोल महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर फेकले. परंतु त्यावेळी नेमके लायटर न पेटल्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सुदैवाने बचावले.

'आमचा पुनर्जन्मच झाला आहे. या धक्क्यातून सावरायला वेळ लागला. एक तासभर तरी मला बोलता आले नाही', अशी प्रतिक्रिया संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याने दिली. या संदर्भात आरोपीविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध कठोरता कठोर कारवाई करा, असे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply