Pune : पुण्यातील भरवस्तीत युवकांचे धाडस; काेयता दाखवत दिवसाढवळ्या व्यापाऱ्याचे ४७ लाख लुटले

Pune Crime News : पुणे शहरातील मध्यवस्तीत आज (गुरुवार) दिवसाढवळ्या एका व्यापा-ायाला काेयत्याची भीती दाखवून युवकाने तब्बल ४७ लाख रुपये लुटलें. या घटनेनंतर तातडीने घटनास्थळी पाेलिस दाखल झाले.

ही घटना नाना पेठेत घडली. आझाद आळी मधून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कोयता दाखवत संबंधित व्यापा-याकडे पैश्याने भरलेली पिशवीची मागणी केली. घाबरलेल्या व्यापा-याराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु चाेरट्याने पिश्वी घेऊन घटनास्थळावरुन धूम ठाेकली.

या घटनेबाबत घटनास्थळावरुन मिळालेली प्राथमिक माहिती अशी तंबाखूचा व्यापारी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे जमा करण्यासाठी दुचाकीवर नाना पेठेतून निघाला हाेता. तेथील आझाद आळीतून बाहेर येताच त्यास दोन युवकांनी दुचाकीवरून येत अडवले.

त्या दोघांनी व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवला. त्यांच्याकडील पैशाने भरलेली पिशवी घेऊन दोघेही पसार झाले. व्यापारी असल्याच्या कारणामुळे दररोज बँकेत पैसे जमा करण्यासाठी मोठी रक्कम ते घेऊन जात असतात. या पिशवीत तब्बल ४७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply