Pune Crime Against Women : धक्कादायक! पुण्यात महिलांवरील अत्याचारात वाढ, दररोज होतेय 9 गुन्ह्यांची नोंद

Pune Crime News : राज्यात महिला बेपत्ता होण्याविषयी सध्या राज्यात जोरदार राजकीय आरोप - प्रत्यारोप होत आहेत. अशातच पुणे शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराच्या दररोज सरासरी ९ घटना शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होत असून त्याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे नोंदणीच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

यात प्रामुख्याने विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देणे, अत्याचार, विनयभंग आणि अपहरण अशा घटनांचा समावेश आहे. मे महिन्यातील २० दिवसांत महिलांबाबत वेगवेगळ्या १७५ घटना पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.

प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक घटना होत असतात. अनेकदा तरुणी, अल्पवयीन मुली, महिला या आपली बदनामी नको, म्हणून त्या कोणाला न सांगता अशा घटना सहन करून शांत राहतात. 

विवाहितेचा छळ होण्याच्या घटनांमध्ये या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत मोठी वाढ झालेली दिसून आली आहे. माहेरहून पैसे आणावे यासाठी अजूनही महिलांचा छळ केला जात आहे. अनेकदा लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच विवाहितेचा छळ सुरू झाल्याचे या प्रकरणांमध्ये दिसून येते. अल्पवयीन मुली, तरुणी, महिलांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. 

या वर्षातील चार महिन्यांत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, गर्दी - मारामारी अशा ५६८ गुन्ह्यांची नोंद शहर पोलिस दलात झाली होती. त्याचवेळी महिलांविषयक ७९५ गुन्हे दाखल झाल्याचे दिसून येते.  



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply