पुणे : नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा ; पुरवठा निरीक्षक महिलेला धक्काबुक्की

पुणे  : अन्नधान्य वितरण कार्यालयातील निरीक्षक महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अन्नधान्य वितरण कार्यालयातील पुरवठा निरीक्षक महिला अधिकाऱ्याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुभाष जगताप तळजाई वसाहत भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. जगताप त्यांच्या प्रभागातील नागरिकांचे शिधापत्रिकेचे काम घेऊन जुन्या जिल्हा परिषद कार्यालयातील अन्नधान्य वितरण कार्यालयात आले होते. त्या वेळी पुरवठा निरीक्षक महिला अधिकारी कार्यालयातील सहकाऱ्यांशी बोलत होत्या.

जगताप यांनी कार्यालयात आरडाओरडा केला. महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून नोकरी घालवण्याची धमकी दिली.जगताप यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांसमोर अपमानित केल्याचे महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सरकारी कामात अडथळा तसेच विनयभंग केल्या प्रकरणी जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply