Pune Crime : पुण्यात तरुण-तरुणी नशेत पोलीस स्टेशनमध्ये राडा, महिला PSIची वर्दी ओढून हाताचा चावा; दोघांनी पोलिसांना धमकी दिली

Pune : पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्यात 3 मार्चच्या मध्यरात्री तरुण तरुणीने दारूच्या नशेत गोंधळ घातला. फक्त गोंधळ घालून हे दोघे शांत झाले नाहीत तर रात्री थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनाच धमक्या दिल्या. मोठी बाब म्हणजे, नशेत असलेल्या तरुणीने रागाच्याभरात महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा चावाच घेतला. या प्रकरणी 24 वर्षीय तरुणीवर आणि तिचा मित्र युवराज निलेश परतानी (वय 24) यांनी दारूच्या नशेत गोंधळ केला आणि पोलीसांना धमक्याही दिल्या. त्यामुळे दोघांवर दारूच्या नशेत गोंधळ, धमकी, आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल केला. अद्याप दोघे पोलीस ठाण्यात आलेले नाहीत.

रात्रीच्या त्या पाच तासात काय घडलं?
दोघे मित्र-मैत्रिण बालेवाडी येथील रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेले होते. मद्यपानानंतर कारस्थान रचून त्यांना मारहाण झाली, असं सांगून त्यांनी रेस्टॉरंटमध्ये गोंधळ केला. हॉटेल मॅनेजरकडे सीसीटीव्ही पाहण्यासाठी विचारले असता, 'फुटेज मुंबईत आहे, उद्या मिळेल,' असं सांगितलं. यावरून दोघांनी थेट बाणेर पोलीस ठाण्यात जाऊन राग काढला. पोलीस ठाण्यात 3 मार्चच्या रात्री 11.45 वाजता सुरु झालेला गोंधळ 4 मार्चच्या पहाटे 5 वाजेपर्यंत सुरूच होता. बाणेर पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक समोर तरुणीने रागात बोलून पोलीस युनिफॉर्म ओढला आणि हातावर चावा घेतला. युवराजनेही धमकी दिली, 'मी माझ्या पावरने तुमची नोकरी मिटवतो.' दोघांनी असंही सांगितले की उद्या ठाण्यात परत येऊन पुन्हा गोंधळ करतील.

तरुणी पुण्यातील विद्यार्थिनी
युवराज निलेश परतानी मूळचा हरियाणाचा असून पुण्यात नोकरी करतो. या दोघांनी मद्यपान करून पोलीस ठाण्यात घातलेल्या गोंधळामुळे पोलीस देखील हैराण झाले होते. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत आणि पुढील कारवाई लवकरच होणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *