Pune : दुपारची शांतता भंगली; ‘हॉर्न वाजवू नका’ म्हणताच पेटला वाद, पुण्यात आठ जणांनी बॅटने केली अमानुष मारहाण, स्वारगेट हादरलं

Pune : सोसायटी परिसरात कर्णकर्कश्श हॉर्न वाजवल्याबाबत जाब विचारल्याने एका नागरिकाला आठ-नऊ जणांच्या टोळक्याने बॅट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना स्वारगेट परिसरातील महर्षीनगर भागातील न्यू कॉमनवेल्थ बिल्डिंग येथे ही घटना घडली.

या प्रकरणी ५९ वर्षीय पीडित व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून दुचाकीस्वार आणि त्याच्या सात-आठ साथीदारांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारीला दुपारी साडेचारच्या सुमारास मारहाणीचा प्रकार घडला. तक्रारदार न्यू कॉमनवेल्थ सोसायटीत राहायला आहेत. आरोपी दुचाकीस्वार बाहेरून सोसायटीच्या पार्किंगमध्ये आला. त्याचा मित्र तेथे भाड्याने राहतो. त्याने मित्राला बोलावण्यासाठी एकसलग दुचाकीचा कर्णकर्कश्श हॉर्न वाजवला.

हॉर्न वाजवू नका
आवाजामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने त्याला हॉर्न बंद करण्यास सांगितले. ‘दुपारची वेळ आहे. लोक सोसायटीतील लोक झोपले आहेत. हॉर्न वाजवू नका,’ असे सांगितले. त्यावरून ‘मला सांगणारा तू कोण,’ असे म्हणून आरोपीने शिवीगाळ करून वाद घातला. काही वेळात त्याचे साथीदार घटनास्थळी आले आणि त्यांनी नागरिकाला शिवीगाळ करून मारहाण केली. बॅटने हल्ला करून गंभीर दुखापतही करण्यात आली. या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

शहरात सायलेन्सरमध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *