
Pune : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच भारतीय विद्यापीठ परिसरातील धक्कादायक घटना उघड झाली आहे. देहविक्रय करणाऱ्या एका महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेण्यात आले आणि त्यानंतर झालेल्या वादातून तिला दगडाच्या खाणीत ढकलून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी महिलेला पुण्यातील खडी मशीन चौक परिसरात नेले. तेथे तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यात आले. त्यानंतर काही कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपींनी तिला काठीने गंभीर मारहाण केली आणि नंतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत ढकलल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात कोंढवा येथील जुन्या खाणीत सदर महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या शवविच्छेदन अहवालात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे हा खून असल्याचे स्पष्ट झालं आणि त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
"मृत महिला आणि मुख्य आरोपी एकमेकांना ओळखत होते व त्यांच्यात काही काळापासून संपर्क होता. दोघेही दारूचे व्यसनी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिली आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व पुणे गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने केली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिली.
दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये ओळख पटू नये म्हणून आरोपींनी वापरलेल्या रिक्षाचा काही भाग बदलल्याचं तपासात आढळून आलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

