Pune : आर्थिक वादातून तरुणाचं अपहरण; विवस्त्र करून अमानुष मारहाण, मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट, पुण्यात खळबळ

Pune : पुण्यात आर्थिक वादातून एका तरुणाचे अपहरण करून, त्याला विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. आरोपींनी या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा धमकी दिली. याशिवाय तरुणावर पिस्तुलातून गोळ्याही झाडल्या. कात्रज–कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी येवलेवाडी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

BMC Election : ठाकरे बंधू विरुद्ध शिंदे अनेक राजकीय कारकिर्दींना फटका, शिवसेना कोणाची? ‘त्या’ ८७ जागांवरच होणार निर्णय

याबाबत कोंढवा भागात राहणाऱ्या 31 वर्षीय वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आयुष कामठे, अभी म्हस्के, अभी पाटील, मंगेश माने, कौशल उर्फ ऋषी मोरे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तक्रारदाराच्या ओळखीचे असून, त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता. या वादातून 31 डिसेंबरला आरोपींनी तक्रारदाराला मारहाण करून, जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास आरोपींनी तक्रारदाराला कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरातील मोकळ्या मैदानात नेले. या घटनेनंतर तक्रारदार भीतीमुळे गप्प राहिला होता. मात्र, रविवारी त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळी भेट दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : आर्थिक वादातून तरुणाचं अपहरण; विवस्त्र करून अमानुष मारहाण, मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट, पुण्यात खळबळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *