Pune Crime : १५ वर्षांपासून फरार, एका लघुपटात दिसला, प्रशासन खडबडून जागी; पुण्यातील प्रशांत कांबळेला अटक

Pune Crime : तब्बल १५ वर्षांपासून फरार असलेला आणि पुण्यातून नुकतीच अटक करण्यात आलेला संशयित नक्षलवादी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप (वय ४४) हा १० मार्च २०१८ रोजी युट्यूबवर पोस्ट झालेल्या 'उलगुलान -एव्हरीडे हिरो' नावाच्या एका लघुपटात दिसला. मात्र, तीन मिनिटांच्या या लघुपटात त्याचं नाव 'सुनील जगताप सर' असं नमूद असून, तो खालापूर (रायगड जिल्हा) येथील आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक काम करीत असल्याचं दाखविण्यात आलं आहे.

लघुपटात तो स्वतःच्या कामाची माहिती सांगताना दिसत आहे आहे. हा लघुपट सात वर्ष इंटरनेटवर असूनही तपास यंत्रणांना त्याबद्दल समजलं नाही. त्याने सुनील जगताप नावाने खालापूरच्या पत्त्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि पासपोर्ट देखील मिळवल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. तो २०२१ मध्ये शेतकरी आंदोलनातही सहभागी झाला होता आणि नेपाळसह भारतातील विविध राज्यात फिरायचा, असं पोलिसांनी मुंबई सेशन कोर्टात सांगितलं आहे.

२०११ मध्ये दाखल नक्षलवादाच्या गुन्ह्यात त्याला महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने ४ मे २०२५ रोजी अटक केली. कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत १९ मेपर्यंत वाढ केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply