Pune Crime : पोलिस पाटलाची गावात दहशत, रोखंडी रॉडने तरुणाला मारहाण; बंदुकीने गोळीबारही केला, गुन्हा दाखल


Pune Crime : पुण्यातील राजगड वेल्ह्या तालुक्यात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे हल्ला करणारा व्यक्ती हा गावातील पोलिस पाटील आहे. लोखंडी रॉडने ही मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात अरुण शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याचे दृश्य एका हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी याच पोलिस पाटील गणेश शिंदे यांनी हवेत गोळीबार करून खरीव गावात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. खरीव गावातील सार्वजनिक ठिकाणी पोलिस पाटील यांनी आपल्या परवाना असलेल्या बंदुकीने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली होती. या गोळीबाराचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Girl Student : फी माफीसाठी चंद्रकांत पाटील यांच्या १०० महाविद्यालयांना भेटी; मुलींच्या समस्यांसाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना

आता वेल्हे पोलिसांनी पोलिस पाटलांविरोधात कारवाई केली आहे. मारहाण प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यामध्ये गणेश शिंदे आणि तानाजी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार ज्ञानदीप धिवार यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता कलम १२५ व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. जीवाला धोका असल्याने अरुण शिंदे यांनी न्याय मिळावा यासाठी गृहमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवारी वेल्हे पोलिस ठाण्यात पोलिस पाटलांची बैठक आयोजित करत त्यांना मार्गदर्शन केले होते. तालुकास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस पाटलांचा सन्मान करणार असल्याचे सांगत कोणत्याही गुन्हेगारी स्वरूपाचे काम होऊ नये म्हणून तंबी सुद्धा दिली होती. मात्र असे असतानाच वेल्हे पोलिस ठाण्यात पोलिस पाटलाविरुद्ध तक्रार दाखल झाल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यावर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply