Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये १४ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर घटना उघडकीस!

Pune Crime : पिंपरी चिंचवड शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने वारंवार लैंगिक अत्याचार केलेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, 'कुणाला सांगितलं तर तुला जीवे मारीन' अशी धमकी देत २३ वर्षीय आरोपीनं १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. वारंवार झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. ही गोष्ट पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर पालकांनी हिंजवडी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय.

Pune Crime : पुण्यात रक्तरंजित थरार, भररस्त्यात सराईत गुन्हेगाराची हत्या; तिघांना अटक

या प्रकरणात पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंजवडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या (physically abused) आहे. आरोपी पीडितेशी सोशल मीडियावरून संपर्कात आला होता. मार्च २०२४ ते जून २०२४ दरम्यान कार्तिक कांबळे या नराधमाने सोशल मीडियावर पीडित मुलीशी ओळख केली होती. त्यानंतर संपर्कात आल्यानंतर आरोपीने पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचं समोर आलंय.

हिंजवडी परिसरातील नेरे भागातील ही धक्कादायक घटना घडलेली आहे. जीवे मारण्याची धमकी देत तसेच बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने अत्याचार केल्याचं समोर आलंय. याप्रकरणात हिंजवडी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सोशल मीडियावर मैत्री करत आरोपीने पीडित मुलीसोबत गैरप्रकार केल्याचं समोर आलंय. अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण राज्यच हादरत आहे. मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्याचं दिसत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply