Pune Crime : पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; सेक्स एस्कॉर्टच्या नावाखाली तरुणाची हजारोंची फसवणूक

Pune Crime :  पुण्यामध्ये सेक्स एस्कॉर्टच्या नावाखाली एका तरुणाची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. बदनामीच्या भीतीने तरुणाने सायबर चोरट्यांना तब्बल ७८ हजार रुपये दिलेत. पुण्यातील विमाननगर परिसरात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विमाननगर परिसरातील म्हाडा कॉलनीतील १९ वर्षीय तरुणाशी २ तरुणांनी मोबाईलवर संपर्क साधला. पंकज भदौरिया आणि जगदीश नावाच्या आरोपींनी या तरुणाला त्याचेच मॉर्फ केलेले अश्लील फोटो टेलिग्रामवर पाठवले.

Pune News : जलतरण तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

त्यानंतर हेच फोटो तुझ्या आई-वडिलांना पाठवू अशी धमकी या तरुणाला देण्यात आली. त्यानंतर तरुणाच्या व्हॉटसअपवर क्यूआर कोड पाठवला. आरोपींनी तरुणाला सेक्स एस्कॉर्टची सेवा घेतल्याचे सांगितले. ती सेवा रद्द करायची असेल तर पैसे द्यावे लागतील, असे धमकावले. त्यामुळे भीतीपोटी त्या तरुणाने घाबरून आरोपींना ७८ हजार रुपये पाठवले.

घरातून एवढे पैसे गेल्यानंतर तरुणाच्या आई-वडिलांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर घडलेला प्रकार त्याने सांगितला. आपली फसवणूक झाल्याचं समजताच त्याने विमानतळ पोलीस ठाण्यात २ तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply