Pune Crime : अपहरण करून २५ लाख मागणाऱ्यांना सांगलीतून अटक; खंडणीसाठी नेपाळहून केला फोन

खडकवासला : कोंढवे- धावडे येथून एका २७ वर्षीय युवकाचे अपहरण केले. त्यानंतर नेपाळमधील क्रमांकावरून फोन करून २५ लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीला उत्तमनगर पोलिसांनी सांगली येथून अटक केली.

याबाबत, अक्षय मोहन कदम (रा.गोरी खुर्द, ता.खानापुर जि.सांगली), विजय मधुकर नलावडे, प्रदिप किसन चव्हाण, महेश नलावडे, अमोल मोरे, रणजित भोसले (सर्व रा.तासगाव सांगली) यांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली.

कोंढवे- धावडे येथून वैभव श्रीकृष्ण जावध (वय २७) याचे शनिवारी संध्याकाळी घरामध्ये घुसून त्याचे अपहरण केले होते. त्यानंतर, त्याच्या पत्नीच्या मोबाईलवर नेपाळमधील क्रमांकावरून व्हॉट्सअप कॉल केला.

“वैभवला सुखरूप सोडायचे असेल तर, २५ लाख रूपये दे, नाही तर त्याचे बरेवाईट होईल.’ अशी धमकी सारखी देत होता. याचे गांभीर्य लक्षात घेत दहशतवादी विरोधी पथकातील संग्राम केंद्रे यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करीत आरोपी सांगलीत असल्याची माहिती दिली.

Udyan Express : चालत्या ट्रेनमधून तरुणीला बाहेर फेकले,मुंबई-पुणे उद्यान एक्स्प्रेसमधील प्रकार..कारण धक्कादायक

अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील पोलीस उपआयुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांना ही माहिती दिली. त्यांच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी सांगलीला पथक रवाना केले. त्यादरम्यान, अपहरण केलेली गाडी ही पुण्याला येत असल्याचे माहिती मिळाली.

म्हणून एक पथक खेडशिवापुर टोलनाका येथे पाठविले. तेथे आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली. वैभवला तासगाव येथे असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे यांच्या पथकाने सांगली येथून आरोपींना ताब्यात घेतले. बंद पत्र्याच्या खोलीमधून वैभवची सुखरूप सुटका केली. त्याला पत्नी पुनम जाधव हिच्या ताब्यात दिले.

पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, अजय वाघमारे सहायक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे किरण देशमुख, पोलीस अंमलदार संग्राम केंद्रे, समीर पवार, ज्ञानेश्वर तोडकर, अनिरूध्द गायकवाड, सागर हुवाळे व खंडणी विरोधी पथक यांनी ही कामगिरी केली. याचा तपास फौजदार शीतल अनुसे करीत आहेत.

२५ लाख रुपयांचा अपहार केला

आरोपी अक्षय कदमकडे चौकशीत सांगितले की, ‘वैभव त्यांच्याकडे कामाला होता. त्याने २५ लाख रुपयांचा अपहार केला होता. त्यांने एक वर्षांनंतर ही पैसे परत दिले नाही.’ याबाबतची सत्यता, अपहार केल्याबाबत पोलिस तक्रार केली आहे का, हा तपास करायचा आहे. अक्षयने पैसे परत घेण्यासाठी अपहरण करणे, हा कायदेशीर मार्ग नाही.

- किरण बालवडकर, निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply