
Pune : अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष पोक्सो न्यायालयाने तरुणाला ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी काही कायदेशीर बाबींची पूर्तता नसल्याच्या कारणावरून रद्दबातल केली. तसेच, त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून चार महिन्यांत अंतिम निकाल देण्याचा आदेश पोक्सो न्यायालयाला दिला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेजवळच्या झुडपांमध्ये ३ ऑगस्ट २०२२ रोजी पीडित मुलीचं शव सापडलं होतं. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास केला असता, या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचे उघडकीस आले.
आरोपी तरुणाला आईची मदत
मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी पीडितेच्या घराजवळ राहणाऱ्या २४ वर्षीय तेजस उर्फ दादा महिपती दळवी याला अटक केली. तो एका फार्म हाऊसवर कामाला होता आणि त्याला अश्लाघ्य चित्रफिती पाहण्याची सवय होती, असे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. तसेच, घडलेल्या गुन्ह्यात तेजसला त्याच्या आईने मदत केल्याचेही समोर आले.
पोक्सो न्यायालयाने याप्रकरणी खटल्याच्या सुनावणीअंती २२ मार्च २०२४ रोजी तेजसला फाशीची तर, त्याच्या आईला सात वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर दोघांनीही शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले, तर तेजसची फाशीची शिक्षा कायम होण्यासाठी राज्य सरकारने याचिका केली.
कोर्टाने काय सांगितलं?
‘खटल्यात रासायनिक विश्लेषणाच्या १२ अहवालांचा आधार घेण्यात आला. मात्र, आम्हाला विश्लेषकाची उलटतपासणी करता यावी यासाठी त्याला न्यायालयात पाचारणच करण्यात आले नाही. शिवाय कलम ३१३ अन्वये न्यायालयाने आमचे जबाब स्वतंत्र नोंदवले नाहीत. आम्हाला एकत्रित प्रश्न विचारून उत्तरे लिहिण्यात आली. या दोन्ही कारणांमुळे खटल्यात कायदेशीर प्रक्रियेचा भंग झाला आहे’, असे म्हणत दोन्ही दोषींनी ॲड. रिबेका गोन्साल्विझ यांच्यामार्फत अर्जही केला होता.
तसेच ‘विश्लेषकाची उलटतपासणी आणि आमचे स्वतंत्र जबाब याविषयी संधी द्यावी आणि पोक्सो न्यायालयाचा निर्णय रद्द करावा,’ अशी विनंतीही त्यात होती. याविषयीच्या सुनावणीअंती न्या. मनीष पितळे व न्या. श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आणि दोघांच्या अपिलांसह सरकारची याचिका निकाली काढली.
शहर
- Mumbai : मुंबईत गॅस टंचाईचं संकट, सिलिंडरसाठी रांगा, ब्लॅक मार्केट सुरू; 30 टक्के हॉटेल बंद
- SSC Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर फुटलाच नाही; एडिट फीचरचा गैरवापर करून विद्यार्थ्यांची फसवणूक, 18 वर्षीय तरुण अटकेत
- वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम:ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण
- Pune : पुण्यात मोठी कारवाई, टीप मिळताच पोलिसांचा सापळा, फॉर्च्युनर थांबताच 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र
गुन्हा
- Pune : पुण्यात मोठी कारवाई, टीप मिळताच पोलिसांचा सापळा, फॉर्च्युनर थांबताच 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
- एन. रघुरामन यांचा कॉलम:वृद्धांना घोटाळ्यांपासून वाचवण्याची वेळ आलीय
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:प्रत्येक व्यक्ती, परिस्थितीत ईश्वरास पाहायला हवे
- रश्मी बन्सल यांचा कॉलम :थोडीशी काळजी वाटणे चांगले,अवास्तव चिंता काय कामाची?
राजकीय
- राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला महत्त्वाचा संदेश: महाराष्ट्रासाठी वाद बाजूला ठेवून एकत्र या
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
- एलपीजीच्या वाढत्या किमती आणि संभाव्य तुटवडा: स्वयंपाकासाठीचे ५ आधुनिक व किफायतशीर पर्याय
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल
- मुंबईत खलिस्तानी संघटनेच्या नावाने बॉम्बस्फोटाची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे स्पष्ट.
- जागतिक संघर्षात होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग काढत, कच्चे तेल घेऊन ‘शेनलॉन्ग’ मुंबईत दाखल; भारताला तात्पुरता दिलासा.
























Subscribe to my channel



