Pune Crime : शिक्षकच झाले भक्षक! पुण्यात क्रीडा शिक्षकाकडून अल्पवयीन मुलींचा विनयभंग

पुणे : पुण्यातील शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील क्रीडा शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील महानगर पालिकेच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली असून हा प्रकार नोव्हेंबर २०२२ पासून सुरू होता. याप्रकरणी अविनाश गोविंद चिलवेरी (२३) या आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी एका प्राथमिक शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीस होता. मागील २ महिन्यांपासून तो शाळेतील ४ ते ५ विद्यार्थिनींना मोबाईल वरून मेसेज पाठवायचा. तसेच त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचे चुंबन घेऊन त्यांना मिठी मारायचा. काही दिवसांपूर्वी, शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी 'गुड टच बॅड टच' हा उपक्रम एका स्वयंसेवी संघटनेने राबवला होता. यामध्ये मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल सांगण्यात आल्यानंतर विनयभंग झालेल्या विद्यार्थिनींनी हा संपूर्ण प्रकार समोर आणला.

दरम्यान, हा सगळा प्रकार पोलिसांना कळताच त्यांनी शिक्षकाला अटक करत गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम ३५४ (अ) तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आधिक तपास सुरू आहे.

तर शाळेतील शिक्षकच भक्षक निघाल्याने शाळकरी मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तर विद्येचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply