Pune Crime : जेवण न दिल्याने पत्नीचा गळा आवळून खून; धक्कादायक प्रकार उघड

पुणे : जेवण न दिल्याने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतील अटक केली आहे. पुण्याच्या अप्पर इंदिरानगर परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला. सविता संदीप औचिते (३२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती परशुराम जोगण असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगण हा रिक्षा चालक असून तो दिवसभर शहरात रिक्षा चालवून संसार चालवत होता. मयत महिला ही त्याची दुसरी पत्नी असून रविवारी रात्री त्यांच्यात वाद झाले. हा वाद विकोपाला गेला असून तिने त्याला जेवणही दिले नव्हते.

या गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिचा खून केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply