Pune Crime: धक्कादायक! तंबाखूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात खोरे घालून आईचा खून

पुणे : आताच्या घडीला देशाला हादरवून सोडणारी घटना घडली. वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणीचा लिव्ह-इन पार्टनर अफताब पूनावाला याने तिची हत्या करून शरीराचे 35 तुकडे करून ते जंगलात वेगवेगळ्या दिशेने फेकले. दरम्यान अशीच हादरवून सोडणारी घटना आपल्या जवळच्या परिसरात घडली आहे. एका 23 वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

आईची हत्या करण्याचं कारण म्हणजे तंबाखू खायला आईने पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने आईचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये घडली आहे. या क्रूर हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. आईच्या डोक्यात शेतकामासाठी वापरला जाणारा खोरा घालून मुलाने आईचा खून केल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. आईच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या मुलाचे वय 23 वर्ष आहे. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply