Pune Corona News : पुणेकरांचं टेन्शन वाढलं; 27 लाख नागरिक बूस्टर डोसच्या प्रतीक्षेत, मात्र डोसची कमतर

Pune News : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना बाधितांच्या वाढणाऱ्या संख्येची धास्ती आता नागरिक घेताना दिसत आहेत. लोक कोरोनापासून बचावासाठी काळजी घेताना दिसत आहेत. मात्र पुण्यात बूस्टर डोसची कमतरता असल्याने पुणेकरांचं टेन्शन वाढलं आहे.

पुण्यात जवळपास 27 लाख नागरिकांनी बूस्टर डोस घेतलेना नाही. मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना कोरोना लस घेण्यासाठी लोक धाव घेताना दिसत आहे. बूस्टर डोसच्या मागणीत वाढ होत आहे, मात्र पुण्यात लसींची कमतरता कायम आहे.

कोरोना रुग्ण वाढत असल्याने शहरात लसीची मागणी वाढली आहे. या आठवड्यात लसींचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

महाराष्ट्रात काल गेल्या २४ तासांत ५४२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४३६० सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत शनिवारी कोरोनाचे 207 रुग्ण आढळले. सलग पाचव्या दिवशी शहरात 200 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १३८५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील कोविड पॉझिटिव्ह दर 14 टक्क्यांच्या वर असून काल 1,432 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यासोबतच ४७ रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply