Pune CNG Rate: CNGच्या दरात वाढ; प्रतीकिलो 91 रूपये मोजावे लागणार

पुणे : पुणे शहरात सीएनजीची वाटचाल शंभरीकडे होत असून पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. चालू दरामध्ये चार रूपये प्रतीकिलोने वाढ करण्याचा निर्णयमहाराष्ट्र महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड द्वारा (एमएनजीएल) घेतला आहे.

दरम्यान, MNGLने वाढवलेल्या दरानुसार शहरात सीएनजीच्या एका किलोसाठी 91 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एमएनजीएलने सीएनजीच्या दरात चार रूपयांनी कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता, त्यामुळे वाहन चालकांना एका किलोसाठी 87 रूपये द्यावे लागत होते पण आता पुन्हा या दरात वाढ करण्यात आली आहे त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी पेट्रोल डीलर असोशिएशनने मागण्या मान्य न केल्यामुळे एका दिवसाचा बंद पुकारला होता. त्यामुळे डीलरच्या कमिशनमध्ये वाढ न केल्याच्या वादातून टोरंट सीएनजी पंप एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता सीएनजीच्या दरात प्रतीकिलो ४ रूपयांनी वाढ करण्यात आली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply