Pune Bus Fire : प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक घेतला पेट; पुणे-सोलापूर महामार्गावरील थरारक घटना

Pune : पुणे-सोलापूर महामार्गावर एका धावत्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये काही प्रवाशी प्रवास करत गोते. महामार्गावर कदमवाकवस्ती येथे पोहताच धावत्या बसने घेतला पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवतहानी झालेली नाही.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्यासमोर धावत्या बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे संपूर्ण नुकसान झाले आहे. बसने पेट घेतला तेव्हा प्रवाशी आणि रस्त्यावरील अन्य प्रवाशी देखील भयभीत झाले होते.

Mumbai Crime : दादर सुटकेस प्रकरणात नवा ट्विस्ट, अर्शदच्या पत्नीला अटक, हत्येचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले

ही घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बस हैदराबादवरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमध्ये एकूण १७ प्रवासी प्रवास करत होते. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत येथे आले असता अचानक बसचा टायर फुटला आणि गाडीने पेट घेतला.

वाहनचालकाच्या हे लक्षात येताच त्याने सर्व प्रवाशांना आरडाओरडा करत खाली उतरण्यास सांगितले आणि क्षणात संपूर्ण बसला आगीचा विळखा बसला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे धाव घेतली. तसेच त्यांनी आग आटोक्यात आणली आहे.

पुण्यातील सोफा फॅक्टरीला आग

दिवसेंदिवस आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी खराडी परिसरातील एका सोफा फॅक्टरीला देखील आग लागल्याची घटना घडली होती. सकाळी ७.३० वाजता ही घटना घडली होती. यावेळी देखील अग्मिशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं होतं



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply