Pune Breaking News : पोलिसांना गुंगारा, धावत्या ट्रेनमधून उडी टाकून आरोपी फरार; पुण्यात खळबळ

Pune Breaking News : पुण्याहून मुंबईला घेऊन येत असलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देत चालत्या गाडीतून उडी टाकून फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देहू रोड परिसरामध्ये ही घडली आहे. पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल हर्षद शर्मा हा येरवडा जेलमध्ये होता. विशालला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्याच्याशी संबंधित खटला अद्याप कोर्टामध्ये चालू होता. त्यामुळे १३ मे रोजी गुरुग्राम येथील न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला नेण्यात आले होते.

विधानसभेनंतर मविआचं सरकार आल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील का? पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला फार्म्युला

काल दि.15 मे रोजी आरोपीला मुंबईहून रेल्वेने पुणे पोलीस त्याला घेऊन येत होते. मात्र विशालने चालत्या गाडीतून पळ काढला.आरोपी विशाल शर्मा याने देहूरोड परिसरामध्ये चालत्या रेल्वेतून उडी मारली. त्याच्या हातामध्ये बेड्या असून बेड्यांसह आरोपीने रेल्वेतून पळ काढला. या संदर्भात काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तसेच देहूरोड पोलिसांच्या हलर्गीपणाबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply