Bhide Bridge : भिडे पूल झाला बंद! खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Pune : पुणे - खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. परिणामी डेक्कन परिसरातील नदीपात्रात रस्त्यावर पाणी आल्यामुळे भिडे पूल आणि लगतच्या रस्त्यांवरील वाहतूक बुधवारी (ता. २४) दुपारनंतर बंद करण्यात आली आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. खडकवासला धरण भरल्याने पाटबंधारे विभागाकडून बुधवारी सकाळी सात वाजता नदीपात्रात ९ हजार ४१६ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे डेक्कन परिसरात नदीपात्रातील रस्त्यावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाणी आले.

Pune Rains : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शाळांना सुट्टी, पुढील काही तासात मुसळधार

त्यानंतर पोलिसांनी नारायण पेठेतून भिडे पुलावरून डेक्कनकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, वाहनचालकांनी डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी पूलमार्गे जावे, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा -

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे नदीपात्रातील रस्त्याच्या कडेला लावलेली वाहने काढावीत. तसेच, नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply