Pune Bangalore National Highway : ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे आनेवाडी टाेल नाक्यावर ठिय्या आंदाेलन, पुणे- बंगळुरू महामार्गावरील वाहतुक थांबली

Pune Bangalore National Highway : पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील  साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्यावर  उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यावतीने टाेल माफीसाठी आज (साेमवार) रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले आहे. यामुळे टाेल नाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

साताऱ्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर सातारा जिल्ह्यातील नागरिकांना टोल माफी मिळावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने रास्ता राेकाे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला हाेता. त्यानूसार शिवसैनिकांनी आज आनेवाडी टाेल नाका गाठला.

Seizes Foreign Cigarettes : मुंबईमधून १० कोटींहून अधिक किंमतीचा परदेशी सिगारेटचा साठा जप्त

शिवसैनिकांनी रास्ता राेकाे केल्यामुळे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या. यावेऴी आंदाेलकांनी टाेल माफी मिळालीच पाहिजे अशी जाेरदार घाेषणाबाजी केली. सातारा पाेलिस दलाने आंदाेलकांची भेट घेत चर्चेने मागणीवर मार्ग काढू असे सूचविताच आंदाेलकांनी त्यास नकार देत महामार्गावरच ठिय्या मांडला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *