Pune Crime : आंबेगावमध्ये विवाहित महिलेवर प्रियकराच्या ४ मित्रांकडून सामूहिक अत्याचार; जंगलात भेटायला गेल्यावर घडलं भयंकर

Pune Ambegaon Crime : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर प्रियकराच्या मित्रांनीच सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आंबेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवाशी आहे. शुक्रवारी (२३ जून) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जंगलात गेली होती. यावेळी तिच्या प्रियकराच्या चार मित्रांनी दोघांचाही पाठलाग केला.

दोघांनाही जंगलात एकटं पाहून चार नराधमांनी डाव साधला. आरोपींनी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला

दरम्यान, या घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने तातडीने घोडेगाव पोलिसांत (Police) धाव घेतली. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी चार आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply