Pune मध्यरात्री वारजे परिसरात 7 ते 8 वाहनांची धडक, मोठे नुकसान

 

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच मध्यरात्री वारजे परिसरात एक विचित्र अपघात घडला असून 7 ते 8 वाहनांना एकमेकांना धडक बसली आहे. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री सुमारे 12.30 वाजता वारजे येथील RMD सिंहगड स्प्रिंगडेल शाळेजवळ घडला. या अपघातात टेम्पो, ट्रक तसेच चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

बारामतीत खळबळजनक घटना; तरुण तरुणीसह बेपत्ता, आईने पोलिसांत तक्रार दाखल केली

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून, अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *