Pune : मानवतेला काळीमा! अपघातानंतर कुटुंब जिवंत जळत असताना काहीजण मात्र सोनं लुटण्यात व्यस्त

Pune : पुणे शहरातील नवले ब्रीजच्या परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने एकापाठोपाठ एक वाहनांना धडक देत, काही अंतर ट्रक जात राहिला. त्या दरम्यान ट्रकच्या पुढील बाजूला सीएनजी वर चालणारे एक चार चाकी वाहन अडकून राहिले. यामुळे काही मिनिटात चार चाकी वाहनांने पेट घेतला आणि काही क्षणात त्या चार चाकी वाहनातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर ट्रक मधील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच या अपघातामध्ये ट्रक चालकाने टेम्पो, रिक्षा आणि अनेक दुचाकीना धडक दिली होती. यामध्ये वीसहून अधिक नागरिक जखमी झाले होते.

हा एवढा भीषण अपघात होता की, मृतदेह ओळखणे देखील मुश्किल होते. तर रस्त्यावरून जाणारे अनेक नागरिक जखमी नागरिकाच्या मदतीला धावल्याचे पाहण्यास मिळाले. तर दुसर्‍या बाजूला ज्या ट्रकने वाहनांना धडक दिली होती. ती वाहन रस्त्याच्या बाजूला पडले होते. त्या वाहनांमध्ये,तसेच रस्त्यावर जखमी नागरिकांचे पैसे पडले होते. ते पैसे काही नागरिक गोळा करीत असलेला व्हिडिओसमोर आला आहे. यामुळे माणुसकी हरपल्याचे दिसून आले.

Jammu-Kashmir : दिल्लीनंतर जम्मू-काश्मीर हादरले, पोलिस ठाण्यात भयंकर स्फोट; २ पोलिस अधिकाऱ्यांसह ९ जणांचा मृत्यू

स्वाती संतोष नवलकर, वय ३७ वर्षे रा.विश्वास पॅलेस धायरी फाटा, शांता दत्ताञय दाभाडे वय ५४ वर्षे, दत्ताञय चंद्रकांत दाभाडे वय ५८ वर्षे रा धायरी फाटा, मोक्षिता हेमकुमार रेडडी वय ३ वर्षे चिखली, धनंजय कुमार कोळी वय ३० वर्षे,रोहित ज्ञानेश्वर कदम वय २५ वर्षे,रुस्तुम ऋदार खान वय ३५ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा किरवारी तहसील हसोली किसनगड जिल्हा खेरतल राज्य राजस्थान आणि मुस्ताक हनीफ खान, वय ३१ वर्षे, व्यवसाय क्लिनर, रा.मनापुरी तहसिल अलवर राजस्थान या आठ जणांचा या अपघातामध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *