Pune Accident : नगर-कल्याण महामार्गावर बस-कारची समोरासमोर धडक; कारचा झाला चुराडा, दोन महिलांचा जागीच मृत्यू

Pune : नगर कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. आळेफाट्यावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसची समोरुन येणा-या कारला समोरासमोर धडक झाली या भिषण अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यु झाला रिया गायकर,कुसुम शिंगोटे असे अपघात मृत्यु झालेल्या महिलांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे नजिक कल्याणच्या दिशेने येणारी कार आणि नगरच्या दिशेने जाणारी खासगी बसची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातात नगर जिल्ह्यातील कळंब येथील रिया गायकर व कुसुम शिंगोटे या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Pune : पुण्यात गटारीच्या दिवशीच कोयता गँगचा धुमाकूळ; कॅम्प परिसरातील वाईन शॉपची तोडफोड

यात काहीजण जखमी झाल्याची माहिती असून जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बस आणि कार रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाली होती. क्रेनच्या सहाय्याने कार आणि बसला बाहेर काढण्यात आलं आहे. यात दोन्ही वाहनांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. दरम्यान ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply