Pune Accident News : नवले पुलाजवळ विचित्र अपघात, 9 वाहनं एकमेकांवर आदळली; जाणून घ्या महामार्गावरील वाहतूकीची स्थिती

Pune Accident News : पुण्यातील नवले पुलाजवळ  आज (शनिवार) सकाळच्या सुमारास विचित्र अपघात  झाला. सुमारे आठ ते नऊ वाहनांची धडक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली. या अपघाताची पाेलिस चाैकशी करीत आहेत.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी : ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने अपघात घडला आहे. या अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Nanded News : अशोक चव्हाणांचा काँग्रेसला 'दे धक्का'; ५५ नगरसेवकांनी ठोकला पक्षाला रामराम

या अपघातामधील सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. पाेलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. सध्या महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply